सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांचे अतिशय कट्टर समर्थक श्रीमंत हक्के यांनी दिला राष्ट्रीय समाज पक्षाचा राजीनामा दिला आहे.
हक्के यांनी आपण राजीनामा दिल्याची माहिती स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यांनी पक्षावर नाराज नसल्याचे सांगत आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागील काही महिन्यांपासून हक्के हे भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वारंवार संपर्कात आल्याचे पाहायला मिळाले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हक्के हे कोणत्या पक्षात दाखल होतील हे बघणे गरजेचे ठरणार आहे.