सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय?
सोलापुरातील स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थान राज्यात मिळाले आहेत. गाडी चोरी प्रकरणी बिष्णोई गँग मधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजापूर नाका पोलिसांनी ही कारवाई केली.
फिर्यादी नामे आण्णाराव म्हेत्रे राहणार संत तुकाराम नगर, विजापूर रोड, सोलापूर यांचे घरासमोरून दि. १६/०१/२०२५ रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी चोरी गेलेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचा तपास शितलकुमार गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत असुन दाखल गुन्हा उघडकीस आणणेकरीता पोलीस आयुक्त सोलापूर शहर व पोलीस उप-आयुक्त साो (परिमंडळ), सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग- २ सोलापूर शहर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकिस आणणेकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि शितलकुमार गायकवाड यांना रसुचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार विजापुर नाका पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस स्टाफ असे सदर गुन्हयाचा तपासा दरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे १३५ सी.सी.टी.व्ही. फुटेज व १२ ठिकाणचे डम्प डाटा काढुन त्याचे तांत्रिक विश्लेषन करून राजस्थान येथुन आरोपी क्र. १ रमेशकुमार प्रभुराम बिश्नोई वय २५ वर्षे, रा. घर नं. १६४ मासोई की ढाणि सिया ता. सांचौर, जिल्हा जालौर, राज्य राजस्थान आरोपी क्र. २ रूपाराम मनाराम बिश्नोई वय ३२ वर्षे, रा. पुनासा, ता. भिनमाल जिल्हा जालौर, राज्य राजस्थान यांना अटक करून सदर गुन्ह्यात फिर्यादीची चोरीस गेलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी जप्त केली आहे तसेच गुन्ह्याचे तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदाई कंपनी क्रेटा GJ09BK1123 जप्त केली आहे.