सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती
सोलापूर अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका सुरजपालसिंह ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर जिल्हाधिकारी पदी झाल्यामुळे हे पद रिक्त होते. मागील काही दिवसांपासून अप्पर जिल्हाधिकारी पदी महिला अधिकारी येणार अशी चर्चा असल्यास मिळत होती.
आता शेवटी त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका प्राधिकरणच्या सह आयुक्त मोनिका सुरजपालसिंह ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाचे उपसचिव गावडे यांनी ठाकूर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
अप्पर जिल्हाधिकारी पदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयात महिलाराज झाल्याचे चित्र आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी पदी मनीषा कुंभार यांची नियुक्ती झाली या कार्यालयामध्ये कडे अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, त्यानंतर जिल्हा प्रशासनाधिकारी तर काही पदांवर तहसीलदार महिला अधिकाऱ्यांचीच नियुक्ती झाली आहे.