महेश कोठे यांचे पार्थिव दोन तास अंत्यदर्शनासाठी विडी घरकुल येथे राहणार
माजी महापौर महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव सोलापुरात पोहचल्यानंतर सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
तद़्नंतर मोरारजी पेठ येथील त्यांच्या ‘राधाश्री’ निवासस्थानी नागरिकांसाठी अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली.