“वा रे किसनभाऊ, अजितदादांना थेट ट्राफिक दिली भेट
सोलापूर -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था, माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीनं जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये ९०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे त्यांची भेट घेऊन ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली.
याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माणिक कांबळे, आनंद गाडेकर, प्रथमेश पवार आदींची उपस्थिती होती. ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि किसन जाधव यांचे सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय कार्यकीर्द कौतुकास्पद असून जिल्हास्तर राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने आपल्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचे गौरव केले.
दरम्यान नुकतेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली. छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच किसन जाधव यांनी नामदार छगन भुजबळ यांना मखमली टोपी, शाल, पुष्पगुच्छ, प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करीत सन्मान केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला यश मिळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी छगन भुजबळ यांनी यावेळी केली.