सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव परंतु राष्ट्रवादीचा दावा कायम ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली या कारणासाठी भरगच्च पत्रकार परिषद
सोलापूर : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर राखीव या मतदारसंघातून महाआघाडी मधून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती आहे मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोलापूर वर आपला दावा कायम ठेवला आहे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेत्यांनी ही माहिती दिली.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या नव्या तुतारी या चिन्हाचे माहिती सोलापूरकरांना व्हावी यासाठी पक्षाच्या वतीने बुधवारी सोलापूर शहरातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी शहराच्या अध्यक्ष सुधीर खरटमल, कार्याध्यक्ष तौफिक शेख, प्रदेशचे नेते यु एन बेरिया, माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, शंकर पाटील, भारत जाधव यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.
बुधवारी चिन्ह तुतारी वाजविणारा माणुस याची नागरीकांना माहिती व्हावी व ते चिन्ह रुजवावे या हेतुने कौतम चौक, मधला मारूती, माणिक चौक, सोन्या मारूती, नवी पेठ ते छत्रपती शिवाजी चौक पर्यत भव्य पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी लोकसभेचा विषय काढला असता सुधीर खरटमल, महेश कोठे, बेरिया यांनी जरी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव समोर येत असते तरी राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सोडलेला नाही. आम्ही लोकसभेच्या तयारीला लागलो आहे. जरी ही जागा आघाडीतून दुसऱ्या पक्षाला सुटली तरी काही हरकत नाही आम्ही महाविकास आघाडीतून त्यांचा प्रचार प्रामाणिकपणे करू अशी माहिती दिली.