सोलापूरची जागा ही राखीव आहे ना मग विजयकुमार देशमुख उमेदवार कसे? सुशीलकुमार शिंदे यांचा सवाल
सोलापूर : आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवावी, तसे पक्ष नेतृत्वाकडे सांगण्यात आले आहे. त्यानुसार त्या तालुक्यामध्ये जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील. अशी भूमिका काँग्रेसने ते सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली.
काँग्रेस भवनात ते आले असता पत्रकाराशी त्यांनी संवाद साधला.
सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी भाजप कडून लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव समोर येत आहे. असा प्रश्न केला असता सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे ना राखीव आहे ना मग आमदार विजयकुमार देशमुख हे कसे उमेदवार होतील? असे वक्तव्य त्यांनी केले असता त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला आहे असे पत्रकारांनी म्हणताच भाजप काहीही करू शकतो असा टोला त्यांनी हाणला.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी संग्राम थोपटे यांच्याशी जुळवून घेतले आहे. सोलापुरातील थोपटे कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला असता सोलापुरात कुणीही संग्राम थोपटे नाहीत, सर्व आमचेच आहेत मी कायम त्यांना भेटत असतो असे उत्तर त्यांनी दिले.
प्रकाश आंबेडकर हे आमचे सहकारी म्हणून आघाडीमध्ये येत आहेत त्यामुळे त्यांना दुखवता कामा नये, पूर्वी ते माझ्या विरोधात उभा राहिले होते, माझ्यासोबत ते खासदार म्हणून संसदेत होते, मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत दपकून बोलण्याचं काहीही कारण नाही. संधी मिळाली तर त्यांना दिलीच पाहिजे असे मत शिंदे यांनी एका प्रश्नावर मांडले.