सोलापूरच्या लाडक्या बहिणीची मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी ; अल्पभूधारक शेतकऱ्यांना…..
चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त पुणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत किसान सन्मान दिवस या कार्यक्रमाचे आयोजन झाले.
तसेच या कार्यक्रमाला प्रधान सचिव एकनाथ डवले, आतारी पुणेचे सर्व अधिकारी व कृषी विज्ञान केंद्रचे महाराष्ट्रातील प्रमुख शास्त्रज्ञ, लालासाहेब तांबडे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे उपस्थित होते. यावेळी यशस्विनी ऍग्रो कंपनीच्या चेअरमन अनिता योगेश माळगे यांचा केंद्रीय कृषिमंत्री व मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी महिला म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी अनिता माळगे यांनी केंद्राचे कृषी मंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जीएसटी मधून अल्पभूधारक शेतकरी यांना सूट मिळावे ही विनंती केली. त्यावेळी आपण आपल्या कंपनीच्या वतीने पत्र पाठवून द्या, यावर सकारात्मक विचार करून चांगली बातमी देऊ असे आश्वासन दिले. दरम्यान राज्यातून आलेल्या ( kvk) कृषी विज्ञान केंद्र स्टॉलला उपस्थित सर्वच मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले.