‘आता गोव्याला चला विमानातून ‘ सोलापुरातून मुंबई व गोव्याला विमानसेवा ; कधी सुरू होणार ; मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती
सोलापूर जिल्हा हा अनेक दृष्टीने महत्वाचा आहे, धार्मिक कनेक्टिव्हिटी असल्याने औद्योगिक, व्यापार, पर्यटन क्षेत्राला चांगले दिवस येतील, 23 डिसेंबरला सोलापूर मुंबई व सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.VGF च्या माध्यमातून राज्य सरकार मदत करत असल्याचे ही ते म्हणाले.
23 रोजी मुंबई वरून 11 वाजून 55 मिनिटांनी विमान निघेल ते सोलापूरला दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल अशी माहिती ही त्यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या टीकेवर ते म्हणाले, अफवा उठवू द्या, गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता होती, तेव्हा का केली नाही, यात निवडणुकीचा काही संबंध नाही, निवडणूक पूर्वी उद्घाटन झाले आहे, पुढील सेवा या उडण योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे मोहोळ म्हणाले.
बोरामणी विमानतळ बाबत माळढोक पक्षी बाबत अडचण येत आहे, त्यावर भविष्यात मार्ग काढावा लागेल असे ते म्हणाले.
संकल्प पत्राच्या माध्यमातून राज्यातील 778 गावातून मेल, पत्र आले त्यातून आठ हजार पेक्षा अधिक सूचना आल्या. महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र देशातील विकसित राज्य बनण्याकरिता आमची पावले असतील,असे ही ते म्हणाले.
व्होट जिहाद हा शब्द पण या निवडणुकीत आला पण आपण एक है तो सेफ है असे म्हणत बोलणे टाळले.
राजकीय दृष्ट्या हजारों कोटींची कामे सरकार करतो आहे. तिन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकू असा विश्वास व्यक्त केला.