सोलापूर जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती
सोलापूर : राज्य सरकारने राज्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील एकूण १२५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनातील एक महिला आणि दोन पुरुष उपजिल्हाधिकाऱ्याचा समावेश आहे. ही पदोन्नती निवडश्रेणीत देण्यात आली आहे. ही पदोन्नती गेल्या आठ वर्षांपासून रखडली होती. आता त्यासंबंधित आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच राज्यात लवकरच ८० अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्यात येणार आहेत. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनातील निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड या तिघांना निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे.
याचबरोबर यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात काम केलेल्या तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांत अधिकारी ज्योती पाटील, प्रांताधिकारी सचिन ढोले तसेच तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, भूसंपादन अधिकारी श्रावण क्षीरसागर यांचाही या पदोन्नतीमध्ये समावेश आहे.