सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. भगवानराव गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.

अंतिम दर्शन आज दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी ११ :०० ते ४:०० वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी होणार आहे.
अंत्यविधी बोराटवाडी ता. माण जिल्हा सातारा येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.