पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार
राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तब्बल 52 बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे पोलीस उपायुक्त दिपाली काळे या तीनही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून दिपाली काळे या मात्र सोलापूरलाच राहणार असून त्यांची नियुक्ती एस आर पी एफ सोलापूरच्या समादेशक पदी झाली आहे.
तर विजय कबाडे यांना नागपूर शहर उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. अजित बोराडे यांची नियुक्ती बृहन्मुंबई उपायुक्त पदावर झाली आहे.
सोलापूर शहर उपायुक्त पदावर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्त अश्विनी पाटील या येत आहेत. त्यांच्यासोबतच पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले गौसर हसन हे शहर उपायुक्त पदावर येत आहेत.