सोलापूर : काँग्रेस पक्षातील माजी पक्षनेते देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक जेम्स जंगम, प्रवक्ते हाजी मलंग नदाफ, माजी नगरसेवक नरसिंग कोळी या नेत्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट घेतली. तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
काँग्रेस पक्षामध्ये विशेषता मोची समाजातून पक्षावर नाराजीचा सूर पाहायला मिळते. मोची समाजातील अनेक महानगरपालिकेतील पद भोगलेले नेते काँग्रेस भवनात पाहायला मिळत नाहीत. ते थेट शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला होत आला आहे. नुकत्याच झालेल्या श्री जांबामुनी महाराज रथोत्सव मिरवणुक अतिशय उत्साही वातावरणात काढण्यात आली. यामध्ये शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचाही पुढाकार पाहायला मिळाला. त्यामुळे ही मिरवणूक चुरशीची दिसून आली.
जेव्हा शरद पवारांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यातील प्रवक्ते हाजीमलंग नदाफ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी खरे कारण सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अकरा जानेवारी रोजी नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश यलगुलवार यांनी आमदार असताना दहा वर्षे शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे हा कार्यक्रम शरद पवार यांच्या उपस्थितीत व्हावा म्हणून पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही सर्व गेलो होतो. पवार यांनी 11 तारीख ऐवजी निश्चितच पुढे वेळ देतो असा शब्द दिला असल्याचे नदाफ यांनी सांगितले.