सोलापूर : मागील काही दिवसापूर्वी सोलापुरात काँग्रेसचा एक छोटा कार्यकर्ता याने स्वतःचा भावी आमदार म्हणून उल्लेख करत एक डिजिटल बॅनर लावला होता त्याची चर्चा आणि थट्टा ही तेवढीच झाली. कारण त्या कार्यकर्त्याची मजल एवढी मोठी नाही हे संपूर्ण सोलापूरच्या राजकीय लोकांना माहिती आहे. काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर त्याला महानगरपालिकेच्या उमेदवारीचे तिकीट तरी मिळते का बघा आणि स्वतःला भावी आमदार म्हणतो असे म्हणून चांगलीच टर उडवल्याचे ऐकण्यास मिळाले.
सोलापुरातील एका मोठ्या आणि नावाजलेल्या दैनिकाने या छोट्या कार्यकर्त्याची चांगलीच पोलखोल केली आहे. स्वतःला भावी आमदार म्हणून घेतो आणि वर्गणीसाठी नेत्यांच्या दारात जात असल्याचे सांगितले आहे.
याच कार्यकर्त्यांनी यापूर्वीच्या काँग्रेस शहराध्यक्ष तसेच विद्यमान शहराध्यक्ष च्या विरोधात असेच पत्रक आणि सोशल मीडियावर बाईट टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वीच्या शहराध्यक्षांना काका काका म्हणायचे आणि त्यांच्याच विरोधात काड्या करायच्या असे अनेक प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले परंतु आत्ताच्या विद्यमान शहराध्यक्षाच्या विरोधात ही मागील वर्षी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना झाल्यानंतर त्यांच्याही विरोधात जाऊन मुलाखती दिल्या होत्या त्याचीही नोंद काँग्रेसने ठेवली आहे. तेव्हापासून हा छोटा कार्यकर्ता या अध्यक्ष भाऊंच्या डोक्यात जाम बसल्याचे ऐकण्यास मिळते. वेळ आला की त्या कार्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते बोलतात.
यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तन-मन धन लावून काम करावे लागणार आहे. यातच सोलापूर दक्षिण मतदार संघातून जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. दक्षिण मतदार संघात सोलापूरचा जुळे सोलापूर, नीलम नगर, नई जिंदगी, सैफुल हा सुमारे दोन लाख मतदारराचा शहरी भाग येतो. याच भागात सुरेश हसापुरे यांनी अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गरजूंत महिलांसाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे, जुळे सोलापूर भागात काँग्रेसचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांना सोबतीला घेऊन लेदर बॉल क्रिकेटची मोठी स्पर्धा घेतली त्यामुळे युवकांमध्ये काँग्रेसबद्दल एक चांगला मेसेज गेला.
मुळात हसापुरे हे शहर मध्ये किंवा शहर उत्तर मध्ये कुठेही हस्तक्षेप करीत नाहीत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या मर्जीनेच ते शहर दक्षिण मध्ये कार्यक्रम घेतात. सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आल्यावर शिंदे साहेब यांनी बोलावले तरच ते त्यांच्यासोबत असतात. अन्यथा शहर काँग्रेस कमिटी मध्ये त्यांची कोणताही हस्तक्षेप पाहायला मिळत नाही.
दरम्यान एका छोट्या कार्यकर्त्यांनी त्याला वर्गणी दिली नाही म्हणून हसापुरे यांच्या विरोधात पत्रक काढले आहे मुळात त्या कार्यकर्त्याकडे सध्या पक्षाचे कोणतेही पद नाही, केवळ बदनामी करण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याची चर्चा काँग्रेस भवनातून ऐकण्यास मिळाली. आपल्या समाजामध्ये चांगले स्थान असलेल्या या कार्यकर्त्यांनी विनाकारण अशा काड्या करून स्वतःचे महत्व पक्षांमध्ये कमी करून घेऊ नये असेही काही जाणकार लोक बोलत आहेत.