सोलापूर काँग्रेस सेवा दलाचे ‘वोट चोर, गद्दी छोड’ स्वाक्षरी अभियान
सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांच्या नेतृत्वात ‘वोट चोर, गद्दी छोड’ हे स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले.
या अभियानाची सुरुवात अतिशय प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आली. साप्ताहिक झेंडावंदनाच्या माध्यमातून या मोहिमेचा शुभारंभ झाला, ज्यामुळे उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेम आणि लोकशाहीच्या रक्षणाची ज्योत प्रज्वलित झाली.
भीमाशंकर टेकाळे म्हणाले, प्रत्येक प्रभागात हे स्वाक्षरी अभियान राबवले जाईल, ज्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल आणि ते आपल्या संविधानिक हक्कांसाठी एकजुटीने उभे राहतील. हे अभियान म्हणजे केवळ स्वाक्षऱ्यांचा संग्रह नाही, तर एक सामूहिक शपथ आहे लोकशाही वाचवण्याची, भ्रष्टाचार उघड करण्याची आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची. हे अभियान केवळ एक मोहीम नाही, तर भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना वाचवण्यासाठीचा एक जागरूकतेचा दीपस्तंभ आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या मतदानाच्या पवित्र हक्काचे रक्षण होईल आणि हुकूमशाहीच्या अंधारात हरवलेली लोकशाही पुन्हा उजळून निघेल.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये इमरान अन्सारी (कारवा फाउंडेशन, मुंबई), संजय कुराडे (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र सेवा दल यंग ब्रिगेड – मीडिया), रेखा बिनेकर (अध्यक्ष, महिला सेवा दल), हरून शेख (माजी नगरसेवक), जब्बार शेख, मेहबूब शेख, चंद्रकांत टिक्के, हनुमंत रुपनर, उस्मान शेख, मशाक शेख, हाजी शेख, चंदू बेनुरे, मुद्दसार बिराजदार, जितूराज गरड, धनश्री देशमाने, शिकुर शेख, रुपया बिराजदार, इब्राहिम कलबुर्गी, दीपक मठ, इब्राहिम अथरवाले, भीमाशंकर भुजाळ, सफदर केरूळ, हनुमंत बसलगी, आदम शेख, चांद बिराजदार, गुलाम शेख, इनुस शेख, बिराजदार, रजिया काझी, जेएम शिकलकर, समीर मकंदर, भाग नगरी, मोहसीन पठाण, यादगिर, मेहबूब सोलापूर, रहमान चौधरी, इम्तियाज यादगिर, अफजल शेख, उस्मान फुलारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने हे अभियान अधिक मजबूत आणि व्यापक झाले आहे.