प्रणिती ताईंच्या मतदारसंघातील शहर मध्य व दक्षिण ठरणार लक्षवेधी ; नरोटे व हसापुरे यांचे सार्थक होणार का?
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात व आपल्या मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात करून गोरगरीब लोकांना, महिलांना, रोजी रोटी मिळवून देऊन अनेक शासकीय योजना व विकास कामे करत परत एकदा चौथ्यांदा हॅटट्रिक करुन विधानसभेत प्रतिनिधित्व करावे आणि यावेळेस हमखास मंत्रिपद पदरात पाडून जनतेचे सेवा करावी ही मनो कामना बाळगून वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवा करावे अशी अपेक्षा होती.
देशाचे नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार व वाढत्या वयाचे शिंदे यांचा विचार करून नवीन लोकांना संधी द्यायचे म्हणुन प्रणिती शिंदे यांना खासदारकीची तिकीट दिले. त्यानंतर गेले दहा वर्ष भाजपाने जनतेचे केलेले निराशा, नाराजी, महागाई, जातीयवाद, गटबाजी याला कंटाळलेले जनता घासून बसलेले असतानाच प्रणिती यांना उमेदवारी मिळाली.
प्रणिती शिंदे यांची क्रेझ काम करण्याचा धमाका, मराठा आरक्षण, सिध्देश्वर चिमणी पाडकाम, असे अनेक कारणाने त्यांचा विजय झाला. त्यानंतर शिंदे यांच्या बरोबर दोनच चेहरे बघायला मिळत होते ते दक्षिण नेते सुरेश हसापुरे व शहराध्यक्ष चेतन नरोटे. या जोडगोडीने ताई व साहेब म्हणतात तसे विश्वासात राहून कामे केले आणि लोकसभेची निवडणूक यशस्वी केली.
आता विधानसभेची निवडणूक दोनच महिन्यावर येऊन ठेपली आहे. ताई कधी एकदा खासदार म्हणून जातात आणि आम्ही कधी आमदार होतो असे अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसले होते. नेमक्या प्रणिती शिंदे या खासदार झाल्या आणि निवडून येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पाठींबा दिला. त्या सगळ्यांना आमदारकीचे तिकीट देऊ म्हणून सगळ्यानाच चाकलेट दिले. आता खरा प्रश्न आहे नेमके तिकिट कोणाला द्यायचे? इलेक्शनच्या अगोदर कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना शिंदे कुटुंबाकडे कोणी नसताना सर्व पक्ष सोडून गेल्यावरही ज्यांनी जिल्ह्याचे राजकारण चाणक्य म्हणून करत होते ते सुरेश हसापुरे यानी शिंदे बरोबर विश्वासाला पात्र राहून प्रणिती जे सांगतील ते कामे मनापासून करत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मैदान तयार करत नेटाने कामे करुन ताईंचा विजय संपादन केला.
25 वर्ष नगरसेवक म्हणून जनतेचे कामे करत शिंदे यांना सहकार्य केले ते शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे या दोघांनीही आता तिकीटाचे मागणी केलेली आहे. कॉंग्रेसला वातावरण चांगले असल्याने अनेकजण इच्छुक आहेत. कमीतकमी मध्यला वीस जण, दक्षिणला वीस जण, आणि उत्तरला आठ जण, अक्कलकोटला तीन जण, पंढरपूर, मोहोळ सगळीकडेच इच्छुक वाढलेले आहेत. आता या सर्व मतदारसंघांपैकी जागा कोणत्या पक्षाला किती येतात व जातात हे अजून गुलदस्त्यात आहे.
शहर उत्तर हा तुतारीला मागतात, शहर मध्य माकप मागतात, दक्षिण तालुका उबाठा शिवसेना मागतात, मग निवडून आलेले खासदार कडे काय..???? असा प्रश्न पडतो. मोहोळ तर मागासवर्गीय साठी राखीव आहे. तिथे कॉंग्रेसला उमेदवार नाही, पंढरपूर मंगळवेढाला राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत आहे, तिथे कॉंग्रेसला कट्टर शिंदे समर्थक उमेदवार नाही. तर एकत्रित महाविकास आघाडी उबाठा, शरद पवार गट आणि कॉंग्रेस लढले तर निष्ठावंतना न्याय द्यायचा का? जागा सोडुन द्यायची हे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी आजपर्यंत कोणाचे ही मन दुखवायचे नाही सगळे माझेच अशा भावनेतून राजकारण केले परंतु शिदे यांच्या उलट प्रणिती शिंदे यांचे राजकारण आहे.
डेरींग, डॅसीगं, तोंडासमोर बोलणे, कामचा तूकडा पाडणे, कोणाचेही भीडभाड न ठेवणे, जनता जनार्दन आपले दैवत समजून कामे करणे असा त्यांचा स्वभाव आहे. आता जर प्रणिती या CWC कमिटीवर असल्याने जागा वाटपात व तिकीट वाटपात त्यांचाच वरदहस्त राहणार आहे. जर त्यांनी मनात आणले तर चार मतदारसंघ कॉंग्रेसला सुटतील अशी काँग्रेस कार्यकर्त्यांना आशा आहे.
दक्षिण सोलापूर, मध्य, उत्तर, अक्कलकोट यापैकी निष्ठावंत आपल्या पडत्या काळात जे मदत केले जे एकनिष्ठ विश्वास राहीले त्यांना तिकीट देऊन निवडून आणणार का हा प्रश्न आहे. सुरेश हसापुरे लिंगायत, चेतन नरोटे धनगर, सिध्दाराम म्हेत्रे माळी लिंगायत, शहर उत्तरला साळी/पद्मशाली समाजापैकी एकाला, मुस्लीम समाजातील कोणाला तरी एकाला असे न्याय देणार का? सध्या सात दिवसांच्या सर्व्हे झाला. स्टार पोल नुसार त्याचे हसापुरे आणि नरोटे या दोघांनी या सर्व्हे मध्ये बाजी मारली आहे. आता त्यांना उमेदवारी देणार का ???? बाकीच्यांची नाराजी दूर कसे करणार, खासदार झाल्यानंतर किती आमदार निवडून आणणार, हे काळच ठरवेल. तोपर्यंत हसापुरे व नरोटेना आमदारकीचे स्वप्न पडत असणार, झोप पण लागणार नाही हे नक्की.