जिल्हाधिकारी व सिईओ यांचा संयुक्त पाहणी दौरा..! सोलापूर जिल्हा प्रशासन आषाढीसाठी सज्ज
सोलापूर – आषाढी यात्रा यशस्वी करणे साठी जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आज सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवाच्या सेवेसाठी सज्ज राहणेचे सुचना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा असे सांगत चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे पाठीवर शबासकीची थाप दिली.
दरम्यान आज जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी हिरकणी कक्ष व वारकरी यांचे साठी उभा करणेत आलेल्या आरोग्य केंद्रास संयुक्तीक भेटी देऊन पाहणी केली.
आज सकाळी ८ वाजता गोपाळपूर, वाखरी, भंडीशेगाव, पिराची कुरोली, वेळापूर, पुरंदावडे, धर्मपुरी, अकलूज (संग्रामनगर) सराटी फाटा यासह बोरगाव, माळीनगर व तोंडले येथील पालखी तळ मुक्कामाची स्थिती जाणून घेतली.
सध्या1)पालखी तळ water proof मंडप, तात्पुरते शौचालय स्थळ, स्नानगृह, पालखी, गोल/उभे रिंगण स्थळ, पालखी कट्टा सुशोभीकरण, पालखी मार्ग रस्ते, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा विहीर व शुद्धीकरण, स्वागत कमान, रोषणाई, टॅकर पाणी भरणा केंद्र, तात्पुरते आरोग्य केंद्र, प्लास्टिक/ कचरा संकलन केंद्राची पाहणी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी विभाग प्रमुखासह केली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या
पालखीचे फुलाच्या वर्षावात स्वागत…!
…………………..
करमाळा तालुक्यात रावगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या
पालखीचे फुलाच्या वर्षावात स्वागत केले. दोन्ही बाजूने जेसीबी चे बकेट मधून फुले टाकून स्वागत करणेत आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी जिल्हात येणारे सर्वच पालख्यांना चांगल्या सुविधा देणेचे आदेश दिले होते.
गटविकास अधिकारी मनोज राऊत व टीमने जय्यत तयारी केली होती. पालखी सोहळा प्रमुख कांचनताई महाराज जगताप यांचे गटविकास अधिकारी राऊत यांनी स्वागत केले. विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, सरपंच रोहिणी संदीप शेळके , ग्रामसेवक रामभाऊ हजारे यांनी व्यवस्थेची माहिती. पालखी सोहळा प्रमुखांना दिली.
वारकरी बांधवांना मसाज सुविधा, मोफत कटींग पासून स्नानगृह व शौचालय सुविधा पुरविणेत आले आहे. विठुरायाच्या भुमीत झालेल्या स्वागताने वारकरी भारावून गेले होते.