भाजपा सोलापूर मध्य पूर्व मंडल कार्यकारणी जाहीर ; या कार्यकर्त्यांना मिळाली संधी
सोलापूर : भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर मध्य पूर्व मंडल कार्यकारणी मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी नवरात्रोत्सवच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आमदार देवेंद्र कोठे व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या सहमतीने, प्रदेश भाजपने दिलेल्या नियमाप्रमाणे घोषित केली.
मध्य पूर्व मंडलाच्या कार्यकारणी मध्ये २ सरचिटणीस, ६ उपाध्यक्ष, ६ चिटणीस १ कोषाध्यक्ष यांच्यासह विविध मोर्चा, आघाडी अध्यक्ष, ४५ कार्यकारणी सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी माहिती दिली. कार्यकारणी करताना मंडलातील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील श्री. अंजिखाने यांनी सांगितले.
मंडल सरचिटणीसपदी राजशेखर येमूल व सतीश तमशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी प्रमोद सलगर, भिमाशंकर जावळे, बाबुराव क्षीरसागर, राज कमटम, संगप्पा बबलाद, राजू चलमेटी यांची नियुक्ती करण्यात आली. चिटणीसपदी चन्नया स्वामी, लक्ष्मीकांत सरगम, नरेश दाते, सुशील नाटकर, गोविंद राजूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्ष पद बालाजी काटकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
मध्य पूर्व मंडलाच्या ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्षपदी सिद्धराम ख्याडे, युवा मोर्चा अध्यक्षपदी अनिल अंजनाळकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी ॲड. शैलेश पोटफोडे, महिला मोर्चा अध्यक्षपदी अंजली वलसा, व्यापारी आघाडी अध्यक्षपदी मनोज पिस्के यांची नियुक्ती करण्यात आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी अभिनंदन केले. सोलापूर शहराची कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर प्रथम कार्यकारणी घोषित करण्याचा मान भाजपा मध्य पूर्व मंडलाने मिळविला आहे.
——-
मंडल कार्यकारणी करताना मंडलातील सर्व प्रभाग, सर्व जातीय समीकरणाचा विचार करून कार्यकारणी करण्यात आली असून नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्यात आला आहे, असे अक्षय अंजिखाने म्हणाले.