सोलापूर भाजप शहराध्यक्षांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा घेतला समाचार ; हीच सल तुम्हाला बोचत आहे
सोलापूर : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता या आरोपानंतर याचे पडसाद सोलापूरच्या राजकारणात उमटले आहेत.
भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आरोप खोडून काढत, नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. जातीय दंगल घडवून आणण्याचा डाव होता हे आपल्याला माहिती होतेचं तर तशी तक्रार का केली नाही.? आता असा कांगावा करण्यात काय अर्थ आहे. म्हणजे प्रचारा दरम्यान प्रणिती शिंदे यांना दंगल अपेक्षित होती का अस म्हणत नरेंद्र काळे यांनी प्रणिती शिंदे यांच्या पलटवार केला.
भाजपा ही अतिरेकी वृत्तीची आहे असा आरोप देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असतात शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारानी भाजपाच्या उमेदवारास भरभरून मताधिक्य दिली, हि सल खासदार प्रणिती शिंदे यांना बोचती आहे, म्हणून तर असे बेताल वक्तव्य प्रणिती शिंदे ह्या करत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र काळे यांनी दिली.
मागील तीन पराभवानंतर मिळालेल्या एका विजया नंतर खासदार प्रणिती शिंदे ह्या इतक्या होरपळून गेल्या आहेत की त्यांच्या नुसता अहंकार दिसून येत आहे. कदाचित याच कारणामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची खंत व्यक्त करत नरेंद्र काळे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर देखील सडकून टिका करताना म्हणाले.