व्यापारी मतदारसंघातून मुश्ताक अहमद चौधरी व वैभव बरबडे फायनल
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून एक मतांनी दोन नावे फायनल करण्यात आले आहेत त्यामध्ये मुस्ताक अहमद चौधरी व वैभव बरबडे यांचा समावेश आहे व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीतून या नावांवर सर्वांना मते शिक्कामोर्तब करण्यात आले.
राणी लक्ष्मीबाई मंडई गटातून मुस्ताक अहमद चौधरी, जुबेर बागवान आणि फयाज बागवान हे तीन नावे पुढे आली होती त्यामध्ये भुसार आडत व्यापारी संघाच्या कार्यालयात बैठक होऊन मुस्ताक चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर दुसरे नाव हे वैभव बरबडे यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. बरबडे हे आमदार विजयकुमार देशमुख समर्थक मानले जातात.
सोसायटी मतदार संघ आणि ग्रामपंचायत मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.