सोलापुरात एमआयएमचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शहराचे पंचनामे गांभीर्याने करा
AIMIM सोलापूर अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या आदेशानुसार सोलापुरातील पावसाच्या थैमान मुळे अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाई साठी पंचनामे करून लोकांना आर्थिक मदत देणेबाबत व शहरात कचरा, ड्रेनेज, नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा विषय गंभीर आहे, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे बाबत पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सोलापुरात मुसळधार पावसाचा थैमान सुरूच आहे ,अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापुरात हाहाकार उडाला आहे , सखल आणि झोपडपट्टी भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना आणखी त्रास झाला आहे , गेल्या दोन ते तीन दिवसापासून नागरिक घरातील पाणी काढत आहेत . घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी सर्व वस्तूंचे नासधूस झालेली आहे , कपडे अन्न धान्य वाहून गेलेले आहे . या कठीण काळात सरकारने तातडीने मदत पोहोचवणे गरजेचे आहे व या संकटातून बाहेर येण्यासाठी आर्थिक मदत करणे फार गरजेचे आहे .
१) राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत पुनर्वसन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याचा अहवाल महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात पाहणी करून सर्व नुकसान झालेल्या नागरिकांचे पंचनामे करून प्रत्येकाला नुकसान भरपाई म्हणून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी .
कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता सरसकट सर्व लोकांना आर्थिक मदत देण्यात यावी जेणेकरून नुकसान झालेला एक ही व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये
घर दुरुस्तीसाठी 6500 रुपये, कपड्यांसाठी पाच हजार रुपये, संसार उपयोगी वस्तूंसाठी अडीच हजार रुपये जाहीर करण्यात आलेले आहे.
तसेच नुकसान झालेल्या कच्च्या घरांसाठी साडेचार हजार रुपये, तर पक्क्या घरांसाठी साडेसहा हजार रुपये जाहीर झालेले आहे.
वस्तुस्थिती पाहता पक्क्या घरांपेक्षा कच्च्या घरांना जास्त नुकसान होतो , म्हणून पक्क्या घरांपेक्षा जास्त रक्कम कच्च्या घरांना देण्यात यावे.
२) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन दिवसांमध्ये पंचनामे करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे हे आश्वासन दोन दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून घाई गडबडीमध्ये पंचनामे करण्यात येऊ नये,
शहरात जाऊन लोकवस्तीत जाऊन ,झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन , परिस्थितीची समक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यावे
३) शहरात कचरा, ड्रेनेज, नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा विषय गंभीर आहे, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, शहरांच्या मुख्य नाल्यांमध्ये झाडी झुडपे मोठी झाल्याने नाल्यातील कचरा तुडुंब भरून वाहत आहे
सर्व झाडे झुडपांची तोडणी करून नाल्याची साफसफाई करून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा संबंधित विभागास आदेश करण्यात यावे ही नम्र विनंती करून निवेदन देण्यात आले.