सोलापूर- कुमठा नाका परिसरात रेणुका देवी अपार्टमेंट, दुसरा मझला, घर नं 201. हे गेले 13 वर्षापासुन बंद आहे.
मागील दोन तीन दिवसापासुन रात्री बंद खोलीतुन फुस्स, शुकशुक , सिरसिर, टँक्य मानवी वाटावे असे आवाज ऐकू येत होते. शेजारील लोक भयभीत झाले होते. कोणी म्हणाले बंद घरावर भूतांनी कब्जा केला तर कोणी म्हणाले घरात सापांनी कब्जा केला.
आवाज फक्त रात्रीच्या वेळीच ऐकु येत. रात्री बारानंतर आवाजाची तीव्रता वाढत. शेजारील लोकांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलिस आले घराला कुलूप असल्याने आतून पाहणी करता आली नाही. उद्या सकाळी कुलुप तोडुन पाहणी करुया असे ठरले.
घटनेची माहिती वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य सिद्धेश्वर मिसालोलु व गणेश तुपदोळे ह्यांना समजली. रात्रीच्या वेळी दोघे घटनास्थळी पोहचले. थांबून थांबून विचित्र आवाज ऐकु येत होते. घोणस किंवा नाग सापाचे आवाज असावेत का? असे समजून त्यांनी आवाज रेकॉर्ड केला. आवाज रेकॉर्ड त्यांनी वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे ह्यास पाठविले. मुकुंद यांनी आवाज व्यवस्थित ऐकून आवाज मागील कारण सांगितले.
हे आवाज कोणा सापाचे नसुन ते गव्हाणी घुबडाचे आहेत, घराच्या खिडक्या उघड्या आहेत का? पाहण्यास सांगितले.
दुसरा मजल्यावरुन मिसालोलु व तुपदोळे खाली उतरून पाहणी केली तेंव्हा सर्व मेन खिडक्या बंद होत्या. परंतु मागील बाजूस असणाऱ्या बाथरूमची खिडकी काच फुटलेली दिसत होती.मागील भाग खूपच अडचणीचा व झाडी वाढल्याने जाता येत नव्हते. लांबुन स्टॉर्च खिडकीत मारले असता खिडकीतून दोन गव्हाणी घुबड दिसून आले. शेजारील सर्वांची भिती क्षणात पळुन गेली. व सर्वांच्या चेहरावर हासु आले. सोमवारी सकाळी मुकुंद शेटे ह्यांनी घटनास्थळी भेट दिली असता गव्हाणी घुबडाची पीसे व विष्टा आढळुन आली.
बंद घर कुलुप न तोडण्याची विनंती करण्यात आली. घुबडानी बंद घरात घरटे केले असणार व घरट्यास व पिल्लांना संभाव्य धोका नको.
गव्हाणी घुबड अर्थात (Indian barn owl)
भारतात सर्वत्र आढणारे घुबड, पांढरट फिक्कट राखाडी रंगाचे घुबड. चेहरा बदाम (दिल)आकाराचा दिसतो. सुंदर घुबड म्हणून ओळखले जाते. जुने वाडे, किल्ले, पडकी घरे,बंद घरे अपार्टमेंट मध्ये आपली घरटी बनवितात. नर मादी दोघे मिळुन पिल्लांचे संगोपन करतात.
एक घुबड एका रात्री पाच ते सहा उंदीर मारून खाते. पिल्लांचे संगोपन वेळी एक गव्हाणी जोडी ऐका रात्री दहा ते पंधरा उंदीर मारतात म्हणून ह्यास शेतकरी मित्र म्हणून ओळखले जाते.
















