दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या सरपंचासह आठ सदस्य शुक्रवारी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयात आले. स्वामी हे बराच वेळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याने दोन ते तीन तास हे सर्व सदस्य थांबून होते, शेवटी स्वामी यांनी या सर्वांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले.
यावेळी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य निसार अहमद कांबळे, अश्विनी कडचे, नीलम भोसले, गायत्री टक्के, मीना कोरे, फातिमा नदाफ, जिजाबाई धायगोडे यांची उपस्थिती होती. गावचे उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी मात्र दांडी मारली.
होटगि स्टेशन ग्रामपंचायतीमध्ये सध्या ग्रामसेवक पदाच्या नियुक्तीवरून चांगलाच वाद पेटला आहे. यापूर्वी दिलेले चारही ग्रामसेवक व्यवस्थित काम करत नसल्याने वैतागलेल्या सर्व सदस्यांनी ग्रामसेवक बदलण्याची मागणी केली. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. होटगी स्टेशन गावानजीक असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विषयीच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गटविकास अधिकारी देसाई यांना सूचना केल्या आहेत. याबाबत अधिक माहिती सरपंच जगन्नाथ गायकवाड व महिला सदस्य अश्विनी कडचे यांनी दिली….


















