या आंदोलनास दिनांक 16 नोव्हेंबर 2021 पासून सुरुवात झाली असून प्राप्त सूचनेनुसार दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर 2021 रोजी विदयापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यालयीन काळात काळ्या फिती लावून राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना,58 महिना थकबाकी व अन्य न्यायिक व हक्काच्या मागण्यासाठी निदर्शने करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर विदयापीठ कर्मचारी संघटना अध्यक्ष गजानन काशीद, उपाध्यक्ष नितीन मुंडफने, खजिनदार हरिष गारमपल्ली, महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, कास्ट्राईब कर्मचारी संघटना अध्यक्ष मलकारसिद्द हैनाळकर, ऑफिसर फोरमचे कार्यालयीन सचिव मलिक रोकडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनाचे उपाध्यक्ष श्रीमती सीता नवगिरे, सचिव श्रीमती लक्ष्मी आढाव व सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

















