सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या माजी महापौर नलिनी चंदेले यांनी सोलापूरात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर नलिनी चंदेले यांना प्रदेशवर मोठी संधी दिली आहे. त्यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिवपदी करण्यात आले असून नलिनी चंदेले यांना मुंबई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश सचिव निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा निरीक्षक दिपाली पांढरे, दक्षिण सोलापूर महिला तालुका अध्यक्ष प्रियंवदा पवार, माजी नगरसेविका नंदा कांगरे, ज्येष्ठ नेते किशोर माळी उपस्थित होते.


















