सोलापुर : येथिल प्रा. आफताब शकीलअहमद मुल्ला हे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ अयोजित व्याखाता पदासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) इंग्रजी या विषयात उत्तीर्ण झाले. सध्या ते डॉ. असदुल्लाह खान ज्यु. कॉलेज, सोलापूर येथे सि. ई.ओ. म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे न्यू कॉलेज कोल्हापूर येथे तर उच्च शिक्षण हे शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे झाले. तसेच सध्या शिवाजी विद्यापीठातून पी.एच.डी. प्रबंधावर काम करीत आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. असदुल्लाह खान, प्राचार्य सादउल्लाह खान, विश्वस्त ईबाद खान, आसिफ इक्बाल, हसीब नदाफ, आणि शिक्षकवर्ग यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व शिक्षकवर्ग,विद्यार्थी व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
———————————

















