एटीएम क्लोनिंग म्हणजे काय?
“सायबर क्राईम तज्ञ एटीएम मशीनमध्ये कॅमेरा वगैरे लपवतात. ज्याद्वारे त्यांना तुमच्या कार्डची माहिती आणि पासवर्ड इत्यादींची माहिती मिळते. एटीएमची अदलाबदल करताना फसवणूक करणारे विशेष प्रकारचे उपकरण बसवून क्लोन बनवतात. यानंतर, याद्वारे खात्यातून पैसे काढता येते”.
सोलापुरात एटीएम क्लोन करण्याचा संशय व्यक्त होतोय. एटीएमच्या रीडर समोर संशयास्पद डिव्हाईस आढळून आले आहे. सोलापुरातील रेल्वे लाईन्स परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सकाळी साडे अकराच्या सुमारास शंकर लोखंडे नावाचे ग्राहक या एटीएममध्ये आले. यावेळी लोखंडे यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एटीएम रीडरच्या समोर आणखी एक डिव्हाइस लावले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांना हे एटीएम क्लोन करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे लक्षात आले. म्हणून त्यांनी बँकेशी संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच बँकेचे अधिकारी, एमटीएम व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या थर्ड पार्टीचे कर्मचारी हे दाखल झालेत.
हे डिव्हाईस नेमके कधी आणि कोणी लावले यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यचे काम एटीएम व्यवस्थपन करणाऱ्या कंपनीकडून सुरू आहे. यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.


















