सोलापूर : जिल्हा दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघार घेण्याचा 15 फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची बैठक शनिवारी शासकीय विश्रामगृहावर दुपारच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला सुरुवातीला माजी आमदार राजन पाटील आले,त्यांनतर आमदार बबनदादा शिंदे आले, नंतर आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दिलीप माने, बबनराव आवताडे ही नेते मंडळी माजी मंत्री दिलीप सोपल यांची वाट पहात होते, सोपल साहेब आले, ते आत येताच सर्व उभे राहिले, सोपल यांनी दिलीप माने यांच्याकडे पाहून आ..,हा..,वय माझं 16…,असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला…, म्हातारे साप झालोय,दात आता पडलेत की, दातातून विष पण येत नाही म्हणताच खसखस पिकली…. सोपल साहेबांचा मजेदार व्हिडीओ पहा…
यानंतर सुरेश हसापुरे करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल, मोहोळचे नेते मनोहर भाऊ डोंगरे, यांचे आगमन झाले आणि बैठक सुरू झाली.















