सोलापूर : मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने यांनी शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माजी आमदार दिलीप माने यांच्या ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या प्रधान कार्यालयात भेट दिली यावेळी दिलीप माने यांनी आमदार माने यांचे स्वागत केले, तब्बल दोन तास माने यांच्या कार्यालयात या दोघांची चर्चा झाली.
या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे, काही माध्यमांनी तर राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या का? असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मात्र जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या राजीनामा नाट्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या काका साठे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार हे आता जवळजवळ निश्चित झाले. जिल्हा दूध संघाचे निवडणूक जाहीर झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाली परंतु मोहोळ विधानसभा मतदार संघात उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 गावांचा समावेश आहे आणि या 36 गावांमध्ये दिलीप माने यांचेही मोठ्या प्रमाणात वर्चस्व असल्याने या दोन्ही नेत्यात विकासकामांबाबत ही चर्चा झाल्याचे बोलले जाते.
सध्या बाजार समिती सभापती निवडीवरून जिल्हाध्यक्ष काका साठे आणि दिलीप मालकांमध्ये नाराजी आहे आणि ही नाराजी मागील काही महिन्यांमध्ये आणखीच वाढल्याचे दिसून येते. एकमेकांवर नाव न घेता टीका करण्याची संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत मात्र दिलीप माने यांचे माजी आमदार राजन मालक तसेच मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने यांच्याशी चांगलेच जमते असे असताना दिलीप माने आणि काका साठे यांच्यात दुरावा का? असाही प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय.
यशवंत माने आणि राजन मालक हे दोन्ही नेते दिलीप मालक आणि काका यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पुढे का? येत नाहीत या दोन्ही नेत्यांनी जर ठरवले तर समन्वयाने काका मालकां मधला वाद निश्चित मिटू शकतो असेही बोलले जाते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटणे गरजेचे आहे अन्यथा याचा फुकटचा फायदा भारतीय जनता पार्टीची कंपनी घेईल अशी चर्चा ऐकण्यास मिळते. दरम्यान यशवंत तात्या यांच्या दोन तासाच्या बैठकीनंतर निश्चितच तालुक्याचा विकास आणि वाद मिटवण्याचा समन्वय झाला असेल अशी माहितीही आतल्या गोटातून मिळते.


















