हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नियोजनाखाली अवंती नगर येथे शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच गरजू गोरगरिबांना चादर वाटप करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, पत्रकार भगवान परळीकर, अविनाश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच सोलापुरात स्वर्गीय बाळासाहेब शिंदे यांच्यामुळे शिवसेना वाढली, शिवसेनेची पहिली सभा बाळासाहेब शिंदे यांच्या मुळेच झाली होती या सभेच्या अनेक आठवणी पत्रकार अविनाश कुलकर्णी आणि पत्रकार भगवान परळीकर यांनी सांगितल्या…
यावेळी आशुतोष बर्डे, नाना मस्के जगदीश मुल्ला, ब्रह्मदेव गायकवाड, नाना कळस्कर, उज्वल दीक्षित आदी उपस्थित होते. विजय पुकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


















