सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र 15 च्या नगरसेविका वैष्णवी करगुळे, समाजकल्याण विभाग व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध नगर फॉरेस्ट येथे समाजकल्याण विभागाच्या विविध योजना रमाई आवास योजना नवीन नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास नागटीळक, अंबादास करगुळे , गौरव खरात, अरुण लोखंडे व्यंकटेश गुरम, वसंतराव नाईक महामंडळचे राहुल अळसंदे, गणेश कोळी, समाज कल्याण विभागाचेप्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, प्रीती पासकंटी, अण्णाभाऊ साठे महामंडळचे नितीन कांबळे युसीडी विभागाचे अधिकारी वसीम शेख, राजु क्षीरसागर, अशोक मस्के, राहुल कांबळे, संदेश शेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रे नगर आवास लाभार्थीचे महिला बचत गट तयार करणे, तसेच कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिला मुली व युवकांना मोफत कोर्सेसची माहिती देण्यात आली. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी याना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देणे आदी माहितीही देण्यात आली.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, रमाई आवास घरकुल योजना व समाज कल्याण विभागाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, मागासवर्गियांसाठी काम करताना संवेदनशीलता व सहानुभूती दाखवा ,राजकारण आणू नका अशा सूचना आमदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या पहा त्या काय म्हणाल्या…

















