सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात कोंबली जात आहेत. त्याचाच परिणाम सोलापूर अक्कलकोट रोडवर मोठा अपघात झाला आणि पाच जणाला आपला जीव गमवावा लागला. 2 गंभीर जखमी असून इतर 7 प्रवासी जखमी झाले आहेत. जीप चालक मोबाईल वर बोलत असल्याने हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले, पोलिसांना सुरुवातीला एका व्यक्तीची ओळख पटली होती नंतर पाचपैकी चौघांची ओळख पटली असून सर्व अक्कलकोट तालुक्यातील आहेत. एका महिलेची मात्र ओळख पटली नाही मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत…
कट्ट्यावा यल्लप्पा बनसोडे वय 55
बसवराज यल्लप्पा बनसोडे वय 42
आनंद इर्राप्पा गायकवाड, वय 25 रा. ब्यागेहाळी, ता.अक्कलकोट,
लक्ष्मण मुरलीधर शिंदे, 42, बनजगोळ तालुका अक्कलकोट
व एक अनोळखी महिला अंदाजे वय 35.
















