सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाने पुन्हा सहा महिन्याची मदत वाढ दिली आहे त्या मुदतवाढीचे पत्र 4 जानेवारी 2024 रोजी प्राप्त झाले आहे. यापूर्वीही बाजार समितीच्या संचालकांना सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली होती.
कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर, जि. सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ दि.१५.०७.२०२३ रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे, संदर्भाधीन दि.१३.०६.२०२३ रोजीच्या शासन आदेशान्वये बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदत दि.१४.०१.२०२४ रोजी संपुष्टात येणार आहे.
ज्याअर्थी, सदर बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळणेबाबत दि.०४.१२.२०२३ रोजीच्या संचालक मंडळ सभेत ठराव क्र.०२ पारीत केलेला आहे.
ज्याअर्थी, पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. पणन-५/कृउबास सोलापूर/सं.मं.मु/१३/२०२४, दि.०२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये, कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर, जि. सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळास पुनश्च मुदतवाढ देणेबाबत प्रस्तावित केले आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर, जि. सोलापूर या बाजार समितीस दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी, आडते, व्यापारी, श्रमजीवी कामगार व बाजार पेठेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे सदरची कामे पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सदर कामे पूर्ण करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहणे आवश्यक असल्यामुळे, बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी ६ महिने मुदतवाढ देण्याची शासनास विनंती केली आहे.
ज्याअर्थी, वर नमूद केलेले कारण लक्षात घेता, कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर, जि.सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळारा आणखी मुदतवाढ देणे योग्य राहील, अशी शासनाची खात्री झाली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पचन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४(३) मधील दुसन्या परंतुकानुसार, पूर्वोक्तानुसार सदस्यांचा पदावधी समाप्त होण्यापूर्वी समितीच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणामुळे समितीच्या सदस्याची सर्वसाधारण निवडणूक घेणे शक्य नाही तर, राज्य शासनास शासकीय राजपत्रातील आदेशाद्वारे वेळोवेळी कोणत्याही अशा समितीचा पदावधी वाढवता येईल, मात्र, अशा प्रकारे वाढविण्यात आलेला एकूण पदावधी एक वर्षाहून अधिक असणार नाही, अशी तरतूद आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम १४(३) गधील दुसन्या परंतुकानुसार शासनात प्राप्त अधिकारांचा वापर करून कृषि उत्पन बाजार समिती, सोलापूर, जि.सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळास दि.१५.०१.२०२४ पासून ६ महिन्यांची मुदत संपेपर्यंत म्हणजेच दि.१४.०७.२०२४ पर्यंत खालील अर्टीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यास या आदेशाव्दारे शासनाधी मान्यता देण्यात येत आहे.