धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटनेचे नेते विवेक लिंगराज यांचा ही समावेश असल्याचे समोर येत आहे. विवेक लिंगराजच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी तसेच नातेवाईक यांची मोठी गर्दी सिव्हील हॉस्पिटल मध्ये झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बलकर क्रमांक एम एच 44 यू 74 95 हे मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ताबा सुटल्याने बलकरने दुचाकीला धडक दिली. व उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात तोहिद माजीद कुरेशी वय वर्ष 20 राहणार सरवदे नगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान वय वर्ष 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर या तिघांचा मृत्यू झाला.
तर सात ते आठ जण जखमी झाले आहे.
जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करत आहेत