धक्कादायक : सोलापूर जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एका घरात दोन मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ७ जुलै २०२५ रोजी रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश असल्याची माहिती आले समोर आली आहे.
उळे गावात घडलेल्या या घटनेने सोमवारी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गोपाळ लक्ष्मण गुंड (वय ३०) आणि त्यांची पत्नी गायत्री गोपाळ गुंड (वय २२) असे या दोघांनी नावे आहेत. गायत्री गुंड यांचा मृतदेह खोलीत फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळला, तर गोपाळ गुंड यांनी दुसऱ्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना मिळताच त्यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्याला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
नातेवाईकांकडून माहितीनुसार गोपाळ गुंड व गायत्री तिचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता आता दोघांचे मृतदेह घरात मिळाल्याने नेमकी ही आत्महत्या का खून? याचा तपास पोलीस प्रशासन करेल. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे.