धक्कादायक : कॅमेरामन दत्तराज कांबळे यांचे निधन
सोलापूर शहरातील प्रसिद्ध कॅमेरामॅन दत्तराज कांबळे यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 40 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुले आई भाऊ वहिनी असा परिवार आहे. कुमठा नाका चौकातील त्यांच्या राहत्या घरातून आज मंगळवार दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघून मोदी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दत्तराज कांबळे यांनी दैनिक दिव्य मराठी आणि दैनिक सुराज्य मध्ये काम करताना आपल्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी काढलेले अनेक फोटो माध्यमांमध्ये प्रचंड गाजले, त्याची प्रचंड चर्चा झाली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारात त्यांचा मृत्यू झाला.