“एक सही महिलेच्या संरक्षणासाठी” शिवसेना महिला आघाडीने घेतली स्वाक्षरी मोहीम ; या कायद्याची अंमलबजावणी करा
सोलापूर : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला व युवती आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर निदर्शने करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.
शिवसेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात युवती आघाडीच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे युवती आघाडीच्या शहराच्या रेखा आडकी, सुनंदा माने, सुनिता थोरात, श्रीदेवी बगले, शशिकला चीवडशेट्टी, मंगल थोरात, जोहरा बेन रंगरेज, जयश्री पाटील, मीना सुरवसे, रमा सरवदे, सुनंदा माने, प्रियांका वाघमोडे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठी संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अस्मिता गायकवाड म्हणाल्या, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आले होती पण त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही म्हणून या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महिला आघाडीच्या वतीने स्वाक्षरी घेतली असल्याचे सांगितले.