अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी
सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली असून त्यांची अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
निवड पत्र देतेवेळी शिवसेना सचिव संजय मोरे,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे, संजय कोकाटे, शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, धर्मराज बगले, धनेश अचलारे, महिला आघाडीच्या अनिता माळगे, प्रियांका परांडे यांची उपस्थिती होती.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे शिवसेनेत येणार असल्याने अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचा निश्चितच फायदा भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अमर पाटील यांना होणार आहे.