अनिता माळगे यांच्यावर राज्याची जबाबदारी ; एकनाथ शिंदे यांचा विश्वास
सोलापूर : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्याच्या पहिला आघाडीच्या अनिता माळगे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून राज्यातील महिला सक्षमीकरण करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने दिली आहे.
शिवसेना पक्षाच्या महिला सक्षमीकरण विभाग प्रभारी समन्वयक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात देण्यात आले आहे. तसे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी काढले.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अनिता माळगे यांनी पत्र स्वीकारले यावेळी माजी मंत्री शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभा संपर्क नेते महेश साठे, प्रियांका परांडे हे उपस्थित होते.
अनिता माळगे यांचे सोलापूर जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचे मोठे कार्य आहे बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आर्थिक सक्षम केले आहे. याचीच पोच पावती म्हणून त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी टाकली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच अभिनंदन होत आहे.