शिवसेनेचे मनीष काळजे ‘शहर मध्य’मध्ये सुसाट ; विकास कामातून विधानसभेचे रणशिंग फुंकले !
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळते काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शहर मध्य हा मतदारसंघ प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने इतर कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध झाली आहे. मागील तीन टर्म सलग प्रणिती शिंदे या आमदार होत्या. त्या तीनही निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहर मध्य भारतीय जनता पार्टीला चांगले मतदान मिळाले त्यामध्ये हिंदुत्ववादी मतांचा समावेश होता.
शहर मध्य हा महायुती मधून शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी कडून राम सातपुते यांना या मतदारसंघातून मागणी वाढली असताना शिवसेना मात्र आपला हक्काचा मतदारसंघ सोडणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चालवलेली रस्सीखेच आणि आडम मास्तर यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी सुटण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेनेला अतिशय चांगले वातावरण या मतदारसंघात आहे.
मध्य या मतदारसंघातून शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या नावाचे चर्चा ऐकण्यास मिळते. परंतु मागील अनेक वर्षापासून या मतदारसंघात मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत.
काळजे यांनी दिलेला शब्द पाळत विशेष म्हणजे मुस्लिम भागातही विकास कामे केल्याचे दिसून आले आहे. यात प्रामुख्याने बेगमपेठ येथील मकरज मशिद सुशोभीकरणासाठी वीस लाखाचा निधी दिला आहे. प्रभात 14 मधील जिजामाता रुग्णालय परिसर विकसित करणे, कुमठा नाका येथील लक्ष्मी विष्णू सोसायटीमध्ये सहा इंच पाण्याची पाईपलाईन टाकणे, काँग्रेस भवन च्या शेजारी असलेल्या 68 लिंगापैकी एका महालिंगाच्या परिसराचे सुशोभीकरण केले, जिल्हा परिषदेच्या समोरच्या बाजूस असलेल्या ठोके धारकांसाठी कायमस्वरूपी जिल्हा परिषदेने गाळे बांधून द्यावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. काळजे यांनी कोट्यावधीचा विकास निधी आणून शहर मध्य या मतदारसंघात विकास कामे केली आहेत.
जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांना शहर मध्ये मधून उभा करण्याचा करण्याचे नियोजन दिसत असले तरी एकूणच त्यांच्या हालचाली पाहता मध्य मध्ये ते कितपत चालतील हा सुद्धा प्रश्न असून मनीष काळजे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शहरप्रमुख मनोज शेजवाळ, शहर संघटक उमेश गायकवाड, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे या सर्वच नेते मंडळींची साथ आहे.