शिवाजी सावंत सरांची शहर मध्य मध्ये मोर्चेबांधणी ; मुस्लिम समाजाला घेतले सोबत ; या बापूंची सदैव साथ
सोलापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये शहर मध्य या काँग्रेसच्या बालेकिल्लामध्ये भाजपाला चांगले मतदान झाले. त्यामुळे विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीला या मतदारसंघातून मोठी अपेक्षा आहे.
राज्यातील महायुतीमधून हा मतदार संघ एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेतील नेते आपली मोर्चे बांधणी करीत आहेत. या मतदारसंघात जिल्हा संपर्कप्रमुख स्वतः शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, राज्याचे प्रवक्त्या ज्योती वाघमारे हे इच्छुक असल्याचे बोलले जाते.
मनीष काळजे यांनीही आपली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळते, दुसरीकडे प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आता मध्य मध्ये गाठीभेटी वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे या मतदारसंघात कार्यक्रम वाढले असून या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मते असून त्यांची मते निर्णय ठरतात. त्या समाजाला त्यांनी जोडून घेतले आहे.
काही दिवसांपूर्वीच विजापूर वेस या मुस्लिम बहुल भागात मोठा कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी मुस्लिम कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेश घडवून आणला. त्या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी इतर समाजासाठी सोलापुरात मशिद ओळख हा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमालाही शिवाजी सावंत यांनी उपस्थिती लावली. स्वातंत्र्य दिनाच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी शहरात उपस्थिती लावल्याने त्यांच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा सावंत सरांसाठी पुढाकार पाहायला मिळतो. सावंत यांच्यासोबत अमोल शिंदे कायम दिसतात. सावंत बंधूंच्या मर्जीतील कार्यकर्ता म्हणून अमोल शिंदे यांची आता चांगली ओळख निर्माण झाली आहे. सरांच्या मोर्चेबांधणीत अमोल बापूंचा वाटा सिंहाचा मानला जाईल असे बोलले जात आहे.