
साहेबांच्या राष्ट्रवादीला धक्का ; ऋतुजा सुर्वे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन युवती जिल्हाध्यक्ष
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड झाल्यानंतर आता जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुद्धा नव्याने होऊ लागल्या आहेत.
सोलापूर जिल्हा युवती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ऋतुजा सुर्वे यांची निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या निवडीबद्दल त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी ही निवड केली आहे.
ऋतुजा सुर्वे या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष होत्या. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदावर संधी दिली आहे. ऋतुजा यांनी यापूर्वी माढा तालुका युवती अध्यक्षपदावर काम पाहिले आहे.