शहर उत्तर मधून दोन लिंगायत नेत्यांनी केली काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी ; बाबा करगुळे यांची मध्य मधून मागणी
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सोलापूरच्या काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील तीन मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर या तीन मतदारसंघात आता इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे.
शहर उत्तर साठी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लिंगायत समाजातील नेते प्रकाश वाले आणि माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस भवन मध्ये येऊन उमेदवार मागणीचा अर्ज काँग्रेस शहराध्यक्षांकडे दाखल केला.
यावेळी महादेव चाकोते, सिद्धाराम चाकोते युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला यांच्यासह लिंगायत समाजातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज पक्षाकडे दाखल केला. यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हरीश पाटील, अशोक देवकते, सुभाष वाघमारे, एडवोकेट संजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
यंदा शहर मध्य या मतदारसंघातून मोची समाजातून मागणीने जोर धरला आहे समाजाची बैठक झाल्यानंतर अंबादास करगुळे, संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारे हे तिघे इच्छुक दिसून आले.