ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना मातृशोक
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगांव येथील माजी सैनिक स्व.गुलाब शेख यांची पत्नी व ज्येष्ठ पत्रकार शिवराज्य पत्रचे संपादक इक्बाल शेख यांच्या मातोश्री शालनबी गुलाब शेख यांचं मंगळवारी, २९ जुलै रोजी पहाटे वृध्दापकाळात निधन झाले. त्या मृत्यूसमयी ७६ वर्षीय होत्या.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगे येथील त्यांच्या मुलीच्या घरापासून दुपारी ०२ वा. अंत्यविधी निघून कासेगांव येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुन,विवाहित मुलगी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.