तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे दिला असताना सुद्धा निवड यादी .? नियुक्ती थांबवा
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष -विजय बिदरकोटे कार्याध्यक्ष-आदित्य पाटील जिल्हा उपाध्यक्ष-प्रशांत शिरगुर यांच्या नेतृत्वात तलाठी भरती विरोधात तीव्र निषेध करून शासनाला त्वरित पेपर फुटी संदर्भात विशेष कायदा करण्यासंदर्भात तसेच पार पडलेली तलाठी भरती रद्द करून पुन्हा तलाठी भरती प्रक्रिया ४५ दिवसाच्या आत लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावा.
तलाठी पेपर फुटी संदर्भात अनेक पुरावे आम्ही संबंधित विभागाला दिले असताना सुद्धा उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. त्या संदर्भात निकाल येणे अपेक्षित असताना तलाठी भरती लवकरात लवकर आटपून त्यांना नियुक्ती देण्याचा घाट शासन का घालत आहे.? महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव त्यांच्याही जागा कमी -जास्त करण्यात आली त्याचबरोबर माजी सैनिकच्या जागा असताना सुद्धा त्या कुठेतरी भरल्या गेले नाहीत तसेच अनाथ मुलांचा जागा जाहिरातीत असताना निवड यादी मध्ये अनाथ मुलाची संख्या कमी दिसत आहे.यामुळे ही भरती प्रक्रिया कुठेतरी चुकत असल्याचं भावना आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थीच्या मनामध्ये येत आहे. यास अनेक त्रुटी तलाठी पेपर मध्ये व तलाठी निवड यादी मध्ये दिसून येत आहे. यासह अनेक मागणीसाठी सोलापूर जिल्हा चे जिल्हाधिकारीना निवेदन देण्यात आले. यावेळी मंगेश गायकवाड रियाज जमादार रवी बिराजदार कुलदीप कमळे सुरज जाधव यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
“राज्यात तलाठी पेपर फुटी संदर्भात अनेक पुरावे आम्ही संबंधित विभाग त्या जिल्ह्यातील संबंधित पोलीस विभागाला सादर केला असताना सुद्धा आणि हायकोर्टात याचिका दाखल करून त्यासंदर्भात निर्णय होण्याच्या अगोदरच तलाठी चे निवड यादी लावण्यात आली परंतु विशेष चौकशी समिती मार्फत चौकशी झाल्याशिवाय नियुक्ती प्रमाणपत्र देऊ नये.प्रामाणिक होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये.माजी सैनिक, दिव्यांग बांधव व अनाथ मुलांच्या जागाची जाहिरात असताना सुद्धा निवड यादीमध्ये निवड केल्या नसल्यामुळे त्याचाही फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.या संदर्भात सखोल चौकशी करूनच निवड करण्यात यावी.
प्रशांत शिरगुर
उपाध्यक्ष तथा प्रवक्ता
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्हा