सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती पदाधिकारी भेटले पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ; गणेशोत्सवामध्ये तीन दिवस…..
सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यावेळी यंदाचे उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, ट्रस्टी दास शेळके, उपाध्यक्ष विजय पुकाळे त्यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पहिला दिवस 7 सप्टेंबर, व शेवटचा दिवस अनंत चतुर्दशी दिवशी रात्री बारापर्यंत वाद्य वाजवण्यासाठी सूट देण्यात आली आहे. परंतु उत्सवाचा नववा, दहावा आणि शेवटचा विसर्जन दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी मिळावी त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे. या प्रकरणात पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


















