पालकमंत्री असावा तर असा ! मयत मुलींच्या कुटुंबियांना वैयक्तिक एक लाख देण्याची घोषणा
सोलापूर : मागील आठ दिवसापूर्वी सोलापूर शहरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी मधील ममता अशोक म्हेत्रे, जिया महादेव म्हेत्रे या दोन शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सोलापूर शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तसेच काही मुली हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत दरम्यान गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते, परंतु त्यांनी हा विषय गंभीरतेने घेत बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये संबंधित मुलींच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, यावेळी आमदार देवेंद्र कोठे, पोलीस आयुक्त राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे, भाजपच्या अध्यक्ष नरेंद्र काळे हे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी या दोन मुलींच्या कुटुंबीयांची घरात बसून सांत्वन केले, तातडीने या दोन्ही कुटुंबीयांना वैयक्तिक एक एक लाख रुपये त्यांनी देण्याची घोषणा केली तसेच मुख्यमंत्री सहायता निधी मधून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्दही त्यांनी दिला.
तसेच यानंतर असे मुले आजारी पडल्यास जर शासकीय रुग्णालयात उपचार होत नसेल तर ज्या खाजगी रुग्णालयात चांगले उपचार होतील तिथे दाखल करावे त्याचा खर्च मी करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर महानगरपालिकेत आढावा बैठकीसाठी ते रवाना झाले.