सफाई कामगार महिला याच माझ्यासाठी भारत माता ; आमदार प्रणिती शिंदे यांचे गौरवोदगार
सोलापूर : स्वच्छतेबरोबर समाजाच्या स्वास्थ्यासाठी सफाई महिला कामगार झटतात. त्यांचे काम आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, आणि याच महिला माझ्यासाठी भारत माता असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
सोलापुरातील इंदिराभवन येथे त्रिशरण एनलायन्टमेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांचा साडी व पुष्प देऊन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी त्रिशरण फाउंडेशनचे राज्य व्यवस्थापक प्रशांत वाघमारे होते. यावेळी मुख्याध्यापिका सीमा यलगुलवार, जनता बँकेचे प्रशासकीय अधिकारी अमोल रामनवर, आरोग्य निरीक्षक अमोल कांबळे, सुनील राठोड, जितू मोरे, फॅमिली प्लॅनिंगचे सुगतरत्न गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत वाघमारे यांनी त्रिशरण फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रात हे फाउंडेशन समाजापासून दुर्लक्षित असलेल्या महिला, पुरुष कामगार व आदिवासी यांच्यासाठी काम करीत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक त्रिशरण फाउंडेशनचे विभागीय समन्वयक शितल कांबळे यांनी केले.
हा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विकास दूत अन्नपूर्णा लांडगे, अश्विनी जाधव, भाग्यश्री वंजारे, अखिला वंगा, वसुंधरा पवार, रुचिता पद्मा, मयुरी ठाकूर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भाग्यश्री वंजारे यांनी केले.