रणधिरे परिवाराकडून खासदार प्रणिती शिंदे यांची कृतज्ञता व्यक्त ; प्रदेशवर दिली संधी
सोलापूर : आंबेडकरी समाजातील नेते, पंचशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल रणधीरे यांची काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्या प्रित्यर्थ सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा रणधीरे परिवाराच्यावतीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीशैल रणधीरे, प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, शाहू सलगर, सिद्धार्थ रणधीरे, योगेश रणधीरे, पारस रणधीरे हे उपस्थित होते.
श्रीशैल रणधीरे हे दिवंगत दलित मित्र नागनाथ रणधिरे यांचे पुत्र आहेत. सोलापुरातील हद्दवाढ भागात रणधिरे सामाजिक कार्य करीत आहेत. मानवता विकास मंडळ शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.