राम सातपुते तुमची सुशीलकुमार शिंदे यांच्या एवढी उंची नाही ; काँग्रेसच्या विजयकुमार हत्तुरे यांचे सडेतोड उत्तर
सोलापूर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला. त्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राम सातपुते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना टार्गेट करताना भगवा दहशतवाद संबोधित करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त हिंदूंची माफी मागावी असे ट्विट आणि फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली आहे.
राम सातपुते यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय झाली असून काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना हे विधान चांगलेच टोचले असल्याचे ऐकण्यास मिळाले.
पण कुणी या दरम्यान काँग्रेस नेते विजयकुमार हत्तुरे यांनी मात्र सातपुते यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
“राम सातपुते तुमची आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या बद्दल बोलण्याची उंची नाही”. एवढ्या दोनच ओळीमध्ये त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.